खारघरमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान व जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिर

खारघरमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान व जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिर


खारघर (प्रतिनिधी)-खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर संस्थेच्या वतीने १४ वे रक्तदान शिबिर या वर्षी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबिरात *माहेश्वरी प्रगती मंडळ*, खारघर यांचे योगदान लाभणार आहे. रक्तदान शिबिराबरोबरच जिमसीकेस प्राणीक हीलिंग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.खारघर मधील तरुण वर्गाला तसेच सर्व रहिवाशांना पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी विनंती केली आहे की, देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्व देशभक्त नागरिकांनी रक्तदान करत साजरे करूया.  

      जिमसीकेस प्राणीक हीलिंग,आपले लाडके समाजसेवक मा. किरण पाटील साहेब व नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने आपल्या विभागात एक आगळे वेगळे *मोफत आरोग्य शिबीर* म्हणजेच कुठलेही औषध न घेता, शरीराला स्पर्श न करता, प्राण शक्तीचा उपयोग करुन आजारातून बरे होता येते. हे कसे  व काय? हे जाणुन घेण्यासाठी व अनुभव घेण्याकरिता खाली दिलेल्या ठिकाणी एकत्र येत आहोत. आपली उपस्थिती आपल्या परिवारासहीत प्रार्थनीय आहे.

      शिबिर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सेक्टर १९ खारघर या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत योजनेत आलेले आहे. युवाप्रेरणा सामाजिक संस्था खारघर यांच्यावतीने खारघर मधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने वरील दोन्ही शिबिरात सहभाग नोंदवावा. 

संपर्क प्रबोध शेटिये 7759996967 /8108891999