सातारा,काशीळ येथील शाळा इमारतीचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन;लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
उद्योजक अविनाश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ॐ दत्त परिवाराचे निनादानंद महाराज, वक्ते इंद्रजित देशमुख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सरपंच अर्चना कोरे, मुख्याध्यापक दीपक महापरळे, माजी विद्यार्थी भरत माने, सुरेश माने, नितीन माने, मंगेश माने, अशोक पवार, संजय जाधव अविनाश जाधव, लक्ष्मण माने, हेमंत माने आदी उपस्थित होते.
यशवंत हायस्कूलच्या इमारत डागडुजीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वी १० लाख रुपये देणगी दिली होती. त्याचप्रमाणे उर्वरित कामांसाठी रविवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आणखी पाच लाख रुपये देणगी जाहीर केली. याबद्दल संस्था तसेच हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.