रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक संमेलन

 रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक संमेलन 



पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि सामाजिक संमेलन मोठ्या उत्साहात रविवारी संपन्न झाले. शाळेच्या प्रांगणात रंगीलो भारतः भारताच्या शाश्वत आत्म्याचा उत्सव या आकर्षक संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ज्यात विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक विविधतेचे आणि एकतेचे प्रभावी दर्शन घडवले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेलचेआमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 
           या सोहळ्यामध्ये नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, लोकगीते, नाट्यछटा आणि संगीत यांच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांची संस्कृती रंगमंचावर साकारली. सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच, शैक्षणिक, क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या सन्मानाने पार पडला. या विद्यार्थ्यांमध्ये १५ जणांनी आयआयटी, ७ जणांनी एमबीबीएस, ३ जणांनी बीडीएस आणि १ विद्यार्थ्याने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमार्फत भारतीय हवाई दलात प्रवेश मिळवला आहे. याशिवाय, ७ क्रीडापटूंनी सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धा, राज्यस्तरीय अॅथलेटिक्स आणि फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जनार्दनभगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व संस्थेचे सदस्य परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुरवे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, संस्थेच्या संचालिका अर्चना ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, निलेश बाविस्कर, आरती नवघरे, नेत्रा पाटील, मुख्याध्यापिका राज अलोनी, कीर्ती नवघरे, किरण पाटील, दीपक शिंदे, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर, अमर उपाध्याय, नितेश पाटील, प्रवीण बेरा, यांच्यासह पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image