युवा नेते प्रीतम दादा म्हात्रे यांच्या हस्ते दिशा संगणक संस्थेचे उद्घाटन
उरण दि २४(प्रतिनिधी)-उरण येथील बाजारपेठेत दिशा संगणक इन्स्टिट्यूट चे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार प्रीतम दादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी पत्रकार तथा शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील उपस्थित होते. यावेळी प्रीतम दादा म्हात्रे यांनी सांगितले की दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून माफक दरात विद्यार्थ्यांना कामगारांना कोर्सचे ज्ञान दिले जाणार आहेत राज्यामध्ये २३० संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण प्रदान करते.उरण मध्ये व तालुक्यातील सर्वांना याचा निश्चितच लाभ मिळणार आहे. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अल्प दरात प्रशिक्षण देण्याचे काम या इन्स्टिट्यूट मधून करण्यात येणार आहे.असे भावना व्यक्त करत प्रितम म्हात्रे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शहरचिटणीस शेखर पाटील यांनीही दिशा इन्स्टिट्यूटला शुभेच्छा दिल्या.दिशा संगणक संस्थचे ब्रँच हेड ज्ञानेश खेंगरे व अंकुश मोहिते यांनी सांगितले की दिशा इन्स्टिट्यूट तांत्रिक व सॉफ्टवेअर प्रशिक्षण प्रदान करते. विविध संगणक अभ्यासक्रमांमध्ये सॉफ्टवेअर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थाना मदत करत आहोत. दिशा व्यवसायाचे सतत बदलणारे स्वरूप आणि जगभरातील उदयोन्मुख गरजा समजून घेते. उद्योग कौशल्य आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही नवशिक्यापासून प्रगत पर्यंत विविध स्तरांचे अभ्यासक्रम ऑफर करतो, आमचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, धोरणात्मक विचार आणि नियोजन या क्षेत्रातील भविष्यातील प्रगतीसाठी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतात, जेणेकरून भविष्यासाठी पुढे एक फायदेशीर करिअर घडवू शकतील. कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व उरण शहरवासीय मोठ्या संख्येने हजर होते.