श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


पनवेल/प्रतिनिधी 
गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन आगरी कोळी भवन नेरूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री श्री.गणेश नाईक उपस्थित होते. 
       यावेळी वन मंत्री श्री.गणेश नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थांचा गुणगौरव व संस्थेसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.श्री.गणेश नाईक यांनी संस्थेच्या सामाजिक योगदानाबद्दल व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,संस्थेचे सचिव जगदीश जाधव तसेच संस्थेतील सदस्यांचे या सामाजिक कार्याबद्दल विशेष कौतुक केले व संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोट.
श्री.गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट मागील २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच अनाथ,अपंग व शिक्षणापासून दुर्बल असणाऱ्या घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.तसेच या संस्थेतून गतवर्षी एक अनाथ विद्यार्थी सी.ए परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला.आजपर्यंत शेकडो माध्यमिक,उच्च माध्यमिक,तंत्र शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले.राज्यातील हजारो अनाथ विद्यार्थ्यांसाठी संस्था एक आशेचा किरण आहे.