केळवणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण

 केळवणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण 



पनवेल : तुळजापुर निवासिनी तुळजा भवानी आणि केळवणे निवासिनी गावदेवी भवानी आईला वंदन करून शिवकार्यास प्रारंभ करत केळवणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण स्थान पुजन, विविध रत्न, लक्ष्मी यंत्र व तामपत्र पुजन करून विधीवतपणे इतिहासकालीन मावळयांच्या वंशाच्या हस्ते करण्यात आले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांचा कार्यक्रम, ध्वजपुजन, वेशिदेव कलश पुजन, शाहिर पोवाडे, छत्रपती शिवरायांची महाआरती, गारद व महाराष्ट्र गीत, शिव व्याख्यान अशाप्रकारे आपले महाराष्ट्राच्या मातीतील संस्कृतीचे दर्शन ट्रेकर्स ग्रुप व केळवणे ग्रामस्थ सर्व मित्रमंडळ यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली करण्यात आले होते. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी महाराजांना पुष्पहार घालून मानाचा मुजरा करून उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
 यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत श्री. मनोहर भोईर (मा. आमदार), श्रीमंत अनिकेतराजे बांदल (श्रीमंत कृष्णाजी राजे बांदल यांचे वंशज), ॲड. विवेक परशुराम भोपी, सौ. शितलताई मालुसरे (सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १२वे वंशज), श्रीमंत श्रीनिवास इंदलकर (श्रीमंत हिरोजी इंदलकर यांचे वंशज), श्री. गुरुराज ठाकूर (सरपंच), सौ. सुवर्णा विनायक गावंड (उपसरपंच), श्री. राजु मुंबईकर, श्री. विश्वास शिवकर, श्री. किशोर ठाकूर, श्री. प्रकाश शिवकर, श्री. दत्तात्रय कडू व केळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.