जनेप प्राधिकरणाने वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडकरता एनएमडीसी समूह पीजेएससी सोबत २१००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी केला सामंजस्य करार
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडच्या बांधकामासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, मंगळवारी, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी एनएमडीसी ग्रुप पीजेएससी (नॅशनल मरीन ड्रेजिंग कंपनी पीजेएससी) सह महत्त्वपूर्ण सहकार्य स्थापित केले. भारताच्या बंदरांच्या पायाभूत सुविधा वाढवण्याची आणि वाढवण बंदराला जागतिक स्तरावर पहिल्या १० बंदरांपैकी एक बनवण्याची जनेप प्राधिकरणाची बांधिलकी या साहचर्याने दाखवून दिली आहे. जनेप प्राधिकरणाचे आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से आणि यासीर झघलौल यांनी या संदर्भातील करारपत्रांची देवाणघेवाण केली.
सामंजस्य करारानुसार, एनएमडीसी ग्रुप पीजेएससीने वाढवण बंदराच्या ड्रेजिंग), रिक्लेमेशन आणि किनाऱ्याचे संरक्षण याकरता वाढवण किनारपट्टीच्या भू किनाऱ्याच्या विकासासाठी अंदाजे २१००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित केली आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एनएमडीसी ग्रुप पीजेएससी भारताच्या सागरी विकासासाठी आपली दृढ वचनबद्धता दर्शवित आहे. एनएमडीसी ग्रुप पीजेएससीचे मुख्य कार्यालय अबू धाबी, यूएई येथे असून हा ग्रुप संपूर्ण मध्य पूर्व आणि त्यापलीकडेदेखील काम करतो. अभियांत्रिकी, सागरी ड्रेजिंग, खरेदी आणि बांधकाम क्षेत्रातील एनएमडीसी ग्रुप पीजेएससी एक सुप्रसिद्ध नाव आहे.
या सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित करताना, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., म्हणाले, "जनेप प्राधिकरण आणि एनएमडीसी ग्रुप पीजेएससी यांच्यातील सामंजस्य करार हा वाढवण बंदराला जागतिक दर्जाचे सागरी केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे हे. धोरणात्मक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी बंदर प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात जागतिक कौशल्याचा सामावेश करते. नियोजित वेळेआधीच झालेल्या प्रगतीसह, आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी, भविष्यातील व्यापार मागण्या पूर्ण करण्यासाठी भारताच्या बंदर क्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत."
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री शांतनु ठाकूर यांच्या उपस्थितीत व्हीपीपीएलसाठी अनेक सामंजस्य करार यापूर्वी करण्यात आले आहेत.