लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा 




पनवेल (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कैलासवासी मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनः प्रतिष्ठापना आज (सोमवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.
          सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न झाला. रविवारी श्री गणेश पूजन, देव मूर्तीची मिरवणूक, शुद्धीकरण, भजन, महाप्रसाद तर सोमवारी होम, कलश, घंटा दीप आणि ध्वजपूजन , मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महानैवेद्य अशा कार्यक्रमांचा आयोजन यावेळी करण्यात आले होते. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वाय.टी देशमुख, उद्योजक जे. एम. म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, साई डेव्हलपर्सचे विजय कडू, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, सुनिता भोईर, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, अरुणशेठ ठाकूर, सी.एल ठाकूर, चंद्रकांत भोईर, मंजुषा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान नरेश मोकल, विलास मोकल, संदीप मोकल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image