भारतातील सामाजीक समानता या विषयावरील कार्यक्रम दि.17/02/2025 रोजी भरोसा ता. चिखली जि.बुलडाणा येथे संपन्न

भारतातील सामाजीक समानता या विषयावरील कार्यक्रम दि.17/02/2025 रोजी भरोसा ता. चिखली जि.बुलडाणा येथे संपन्न 


बुलडाणा/प्रतिनिधी दि.२२-भारत सरकारच्या निती आयोग,कार्पोरेट मिनीस्ट्री,सोशल जस्टीस ईम्पॉवरमेंट गव्हरमेंट ऑफ इंडिया या तिन मंत्रालयाच्या मान्यता प्राप्त ग्लोबल हुयमन राईटस प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष,धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे यांच्या अध्यक्षतेखाली भरोसा ता. चिखली जि.बुलडाणा येथे भारतीतील सामाजीक समानता हा कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल हयुमन राईटस प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष,धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे व महीला मंडळ भरोसा यांनी केले होते.तसेच नविन नियुक्त झालेल्या महिलांना ओळखपत्रे प्रदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन ऍड. डॉ.विजयकुमार कस्तुरे व डॉ.डि.व्हि. खरात यांना निमंत्रीत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे ठिकाणी ज्ञान मंचावरील तथागतांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मरत्न डॉ . काशिराम पैठणे यांनी पुष्प अर्पन करूण अभिवादन केले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ.डि.व्हि.खरात यांनी पुष्पहार अर्पन करुण अभिवादन केले.

      यावेळी पंचशिल गायन मंडळ चिखली यांनी त्रिशरण पंचशिल घेऊन स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे यांचा ग्लोबल हुयमन राईटस प्रोटेक्शन फोरमच्या नियुक्त महिला आघाडी बुलडाणा जिल्हा अध्यक्षा उषा पंढरी जाधव,जिल्हा कार्यकारी अध्यक्षा मायावती मिलींद जाधव, जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास म्हस्के,यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला.तसेच ऍड.डॉ.विजयकुमार कस्तुरे व डॉ.डि.व्हि. खरात आणि पंचशिल गायन मंडळ चिखली यांनी ज्ञान मंचावर धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे यांना उकृष्ट सामाजिक सेवेबद्दल दिल्ली येथे अनेक संघटनांच्या वतीने मिळालेले सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवुन त्यांना सन्मानीत केले.तसेच ग्लोबल ह्युमन राईटस प्रोटेक्शन फोरमच्या नियुक्त महिला आघाडी बुलडाणा जिल्हा अध्यक्षा उषा पंढरी जाधव,जिल्हा कार्यकारी अध्यक्षा मायावती मिलींद जाधव,जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास म्हस्के,चिखली तालुका अध्यक्षा स्वाती कीरण जाधव,तालुका कार्यकारी अध्यक्षा विद्या लिंबाजी श्रीतापे,चिखली तालुका उपाध्यक्षा सुनंदा शेषराव जाधव,तालुका सेक्रेटरी पंचशिला श्रीकिसन साळवे,तालुका उपाध्यक्षा मिना देवराव डोंगरदिवे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे यांनी पुष्प गुच्छ,शाल व ओळखपत्रे प्रदान करूण जाहीर सत्कार केला.तसेच ऍड.डॉ.विजयकुमार कस्तुरे यांचा पुष्पगुच्छ,शाल देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मरत्न डॉ.काशिराम पैठणे यांनी सत्कार केला.तसेच डॉ.डि.व्हि.खरात यांचा जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास म्हस्के यांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार केला.यावेळी डॉ. खरात यांनी ग्लोबल हयुमन राईटस प्रोटेक्शन फोरमच्या बाबतीत आपले विचार प्रकट केले.धम्मरत्न डॉ . काशिराम पैठणे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात भारतातील सामाजिक समानता व ग्लोबल हयुमन राईटस प्रोटेक्शन फोरम बाबत आपले विचार प्रकट केले.ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व महिलांना संविधानाद्वारे हक्क,अधिकार बहाल केल्याने आजची महिला ही सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर गेलेली दिसत आहे.या वेळी भिम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते आयु.शेषराव जाधव,आयु.वैभव सोनपसारे,आयु. अरूण जाधव यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमास अनेक उपासक उपासिका हजर होते.