ऐरोली, कोपरखैरणे व बेलापूर विभागात अतिक्रमण विभागामार्फत कारवाई
नवी मुंबई/प्रतिनिधी
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली, कोपरखैरणे व बेलापूर विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली कार्यक्षेत्रातील बी-458,बी-459, बी-460, सी-519, सी-520, सी-206 व सी-207, सेक्टर-2 ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम नमुंमपाच्या अंतर्गत अंशत: निष्कासित करण्यात आले आहे.
या धडक मोहिमेसाठी 8 ब्रेकर, 6 हॅमर, 3 गॅस कटर, 20 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता सहा. आयुक्त श्री. डॉ. अंकुश जाधव जी विभाग ऐरोली, एच विभाग दिघा व एफ विभाग घणसोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अंतर्गत प्रत्येक बांधकाम धारकाकडून रूपये 25,000/- प्रमाणे एकुण दंडात्मक शुल्क रूपये 1,75,000/- वसूल करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत श्री.प्रभुराव नरसिंहराव जगदनकर,SS टाईप,रूम नं 400,सेक्टर-7,कोपरखैरणे,नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आला.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता श्री.चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच 8 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01 कारवाई करीता वापर करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर विभागाअंतर्गत 1) स्मिता प्रमोद भोईर, घर क्र. 288/00185 करावे गांव, से.36 नवी मुंबई, 2) पुनम किशोर पाटील, घर नं. 0824/0005, करावे गांव, से. 36, 3) भरत तांडेल, घर क्र. 823 करावे गांव नवी मुंबई यांचे अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. तसेच
1) मंगेश वसंत पवार/ कल्पना वसंत पवार/ अनिता मंगेश पवार, ट्रायसिटी पॅलेस, प्लॉट नं07, प्लॅट नं. 303, से.38 करावे गांव नवी मुंबई यांना अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 (1 अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली आहे.
संबधितांनी वरील, केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करावे येथील MRTP कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या 03 अनधिकृत बांधकाम नमुंमपा व सिडको कडील अधिकारी/ कर्मचारी यांचे सहसंयुक्तपणे निष्कासित कारवाई करण्यात आली आहे. तसेच MRTP कलम 53 (1 अ) अन्वये बजाविण्यात आलेल्या 01 अनधिकृत बांधकाम निष्कासित कारवाई करण्यात आलेली आहे. या धडक मोहिमेसाठी अे विभागकार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, मजूर-15, मुकादम-01, हॅमर -01, गॅसकटर-01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.