उलवे शहरात प्रथमच “ओपन स्कायखाली चित्रपट प्रदर्शन

 उलवे शहरात प्रथमच “ओपन स्कायखाली चित्रपट प्रदर्शन




उरण : माई सावित्रीबाई फुले, जिजाऊ माईसाहेब आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंती निमित्त संविधान अमृत उत्सव समिती, उलवे, नवी मुंबई यांच्या माध्यमातून उलवे शहरात प्रथमच “ओपन स्कायखाली चित्रपट प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उलवे मधील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या भगिनींचा सत्कार पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्यासह सचिन घरत, श्री. सचिन राजे येरुणकर, श्री. सुहास देशमुख, श्री. जितेंद्र म्हात्रे, श्री. राजेंद्र घरत, श्री. रोशन म्हात्रे, श्री. हेमंत पाटील,श्री. मिलिंद डोके, श्री. चंद्रकांत बाकळकर, श्री. अखिल यादव, श्री. साई पैकडे आदी उपस्थित होते.