नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने महापालिका मुख्यालयात अभिवादन
पनवेल,दि.23: पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज ( 23 जानेवारी ) नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयुक्त मंगेश चितळे ,उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उप अभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, माजी नगरसेवक, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.