शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; ०२ कोटी ८२ लाख रुपयांची विकासकामे;आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल (प्रतिनिधी) शिवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल ०२ कोटी ८२ लाख ६७ हजार रुपयांच्या दहा विकासकामांचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (दि. १९) भूमिपूजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांचा स्थानिक विकास निधी, २५१५, अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण समाज विकास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस व माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, सदस्य अविनाश गायकवाड, सुकापूर उपसरपंच महेश पाटील, शैवाक ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच रवींद्र ढवळ, माजी उपसरपंच प्रांजल ढवळे, सदस्य मंगेश ढवळे, रितू पाटील, सुरेखा टोपले, रेश्मा पाटील, मनिषा पाटील, मोनिका पोपेटा, संतोष मते, भास्कर पाटील, शंकर महाराज, भरत टोपले, भरत चौधरी, तुकाराम तुपे, बबन ढवळे, गोटीराम ढवळे, गोपीनाथ ढवळे, नजिर शेख, खलील शेख, रमजान शेख, सय्यद शेख, परशुराम ढवळे, अविनाश ढवळे, अरविंद फडके, प्रवीण फडके, सागर ढवळे, अरविंद माळी, निलेश महाराज, समीर पोपेटा, उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी बुद्ध विहारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
शिवकर ग्रामपंचातीमध्ये या विकासकामांतून गावाचा अधिक विकास साधता येणार आहे, त्यामुळे सरपंच आनंद ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे शहरांसोबत गावांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत घनकचरा प्रकल्प तयार करणे (१८ लाख रुपये), शिवकर येथे अंतर्गत भूमिगत गटार तयार करणे(०८ लाख रुपये), वसंत ढवळे चाळ ते दिक्षा बिल्डींगपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे (१० लाख रुपये), सखाराम ढवळे यांचे घर ते प्रदीप कांबळे याच्या घर पर्यंत रस्ते व गटारे पेव्हर ब्लॉक व भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे (०१ कोटी ३० लाख रुपये), बुद्ध विहारचे शुशोभीकरण करणे(०८ लाख रुपये), आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल अभियान अंतर्गत शिवकर गावात नवीन पाण्याची टाकी बांधणे(३० लाख रुपये), मुस्लिम कब्रस्थानाला संरक्षण भिंत बांधणे व सुशोभिकर करणे (३५ लाख रुपये), बौध्द स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधून सुशोभीकरण करणे (२० लाख रुपये), नवीन स्मशानभूमी बांधणे (२० लाख रुपये), आणि व्यायाम शाळेजवळ शौचालय बांधणे (०३ लाख ६७ हजार रुपये) अशा दहा विकासकामांसाठी एकूण ०२ कोटी ८२ लाख ६७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा स्थानिक विकास निधी बरोबरच २५१५, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास आणि अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण समाज विकास निधीची तरतूद केली आहे. यावेळी सरपंच आनंद ढवळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच शिवकर ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी देत या गावाचा विकास साधला असल्याचे अधोरेखित आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले.