26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत असून यानिमित्त सीबीडी बेलापूर येथील नमुंमपा मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8.00 वा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.
तरी याप्रसंगी सर्व नागरिकांनी देशाभिमान अभिव्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.