वीरशैव लिंगायत समाजाचे वधू-वर पालक परिचय मेळावा

 वीरशैव लिंगायत समाजाचे वधू-वर पालक परिचय मेळावा



 उरण दि १३(विठ्ठल ममताबादे) गळ्यात इष्टलिंग, कपाळाला भस्म व भगवान शिवाला आराध्य दैवत मानणारा, शैव संस्कृतीचे आचरण,पालन करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा समिती व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे या सामाजिक संस्था कार्यरत असून या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता धर्मवीर आनंद दिघे सभागृह,गांधी नगर चौक, डोंबिवली(पूर्व ), मुंबई येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व जाती पोट जातीतील इच्छुक वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वधू वर मेळाव्याचे ३५ वे वर्ष आहे. इच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी उपाध्यक्ष बसवंतराव अळगी फोन नंबर -९६६४१४२४१२,९८२०० ६१३६२ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image