मंगळवारी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे निदर्शने
पनवेल (प्रतिनिधी) बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागतिक मानवाधिकार दिनादिवशी अर्थात मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने पनवेलमध्ये मानवी साखळी द्वारे निदर्शने करण्यात येणार आहे. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी व इस्कॅानच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी यासाठी सायंकाळी ४. ३० वाजता पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हे निदर्शने होणार आहे.