महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा

 महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा 



पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी आज (सोमवारी) सुपूर्द केले.                   आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आपला पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहिर केला आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.


Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image