लाल बावटा फडकवून विधानसभेत शेकापची ताकद दाखवा- प्रितम जे एम म्हाञे

 लाल बावटा फडकवून विधानसभेत शेकापची ताकद दाखवा- प्रितम जे एम म्हाञे


पनवेल : पनवेल- उरण तालुक्यात शेकापची ताकद मोठी आहे, माञ मध्यंतरीच्या काळात काही कारणाने पक्षाची ताकद कमी झाली. परंतू शेकापचा कार्यकर्ता लढावू आहे निष्टावान आहे. या कार्यकर्त्यानी या निमीत्ताने एकजूट दाखवून विधानसभेत पक्षाचा लाल बावटा फडकवावा असे आवाहन प्रितम जे एम म्हाञे यानी भाताण येथे कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना केले.

      विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाताण येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 
यावेळी जगदिश पवार, विनोद साबळे, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आज विधानसभा निवडणूक निमीत्ताने पनवेल तालुक्यातील पोसरी ते भाताण दरम्यानच्या गावातून निवडणुक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज युवकाना रोजगाराची समस्या भेडसावत आहे ती सोडवून तालुक्यात विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आहे त्यासाठी तुम्हा सर्वाची मला साथ हवी आहे या निवडणूकीत मला ती मिळेल असा विश्वास आहे.