"जनसभा"च्या १४ व्या पुस्तकरूपी दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रितमजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) -जनसभाच्या १४ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आज दीडशे पत्रकारांच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात संपन्न झाले.
पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ मधील उरण विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सन्माननिय प्रितमजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते जे. एम.म्हात्रे इन्फ्राप्रोजेक़्ट प्रायव्हेट लिमीटेडचे संस्थापक जे. एम. म्हात्रे यांच्या उलवे नोडमधील कोपरगांव येथील मूळ निवासस्थानी संपन्न झाले.
सन्माननिय जे. एम.म्हात्रे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील पत्रकारांचे दिवाळी स्नेह मिलन आयोजित केले होते.