नेरुळ-उरण ट्रेन ही 12 डब्याची करून फेऱ्या वाढवाव्यात*-शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी"
उरण : नेरुळ ते उरण दरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण ट्रेन च्या फेऱ्या ह्या खूप कमी पडत आहेत. प्रवास करणारा वर्ग हा नोकरदार पासून ते शाळेत जाणारे विध्यार्थी आणि महिला आहेत त्यासाठी सद्यस्थितीत असणारी ट्रेन सुवीधा कामाच्या वेळी कमी पडत आहे. अशा तक्रारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे विविध विभागातील नागरिकांकडून आल्या. यावर काही ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला.