बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

 बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश 


पनवेल:  शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे प्रीतम म्हात्रे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, गुरुनाथ गायकर, राम भोईर, जगदीश पवार, रामेश्वर आंग्रे, अनिल घरत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
      शेकापचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण बीजेपी आणि इतर पक्षातून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत. शेकापमध्ये पक्ष प्रवेशाचा ओघ वाढत चालला आहे. सोनारी गावातील शेकापमध्ये प्रवेश केलेल्या काही जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र या तरुणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, ज्यांना नोकरीवरून काढले आहे त्यांना नोकरीला लावण्याचे काम मी करणार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. घारापुरी येथील निकेतन घरत आणि रोहन पाटील या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला. प्रदीप तुंगारे, गणेश भोईर, विकास मोरे यांनी देखील शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पक्षात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नसल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. 
 

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image