साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचे नागरिकांना आवाहन


एक दिवस कोरडा दिवस पाळू, डेंग्यू ,मलेरिया आजार टाळू


साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचे नागरिकांना आवाहन


पनवेले,दि.25 : पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते.याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी ‘बुधवार’ हा दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे.

पावसाचे पाणी सध्या सर्वत्र साठलेले आहे या पाण्यामध्ये डेंगू ,मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत  किटकजन्य आजराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी  दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. 

      पावसाळ्यांनंतर विविध किटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशा वेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या,फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी ,डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी जेणे करून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करूनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षारसंजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनीप्लँट,वॉटरकूलर,फ्रिजच्या मागील ट्रे, पाणी साठवणीचे ड्रम इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक दिवस ‘बुधवारी’ पुर्णपणे काढून कोरडे करून ‘कोरडा दिवस’  पाळावा, अशा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

     जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले,ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणेअसल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

     हिवताप,डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया,मलेरिया असे साथीचे रूग्ण आपल्या आसपास आढल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा रूग्णालयाशी संपर्क साधावा. रूग्णालयांनी, प्रयोगशाळांनी साथीच्या रोगाचे रूग्ण महापालिकेला  idsppanvelcorporation@gmail.com या ईमेलआयडीवरती कळवावे असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.