के.आं.बांठीया माध्यमिक विद्यालयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा
पनवेल/प्रतिनिधी,दि.११-के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. माळी सर ,उपप्राचार्य श्री आंबरे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री महाजन सर, पर्यवेक्षक श्री.गोखले सर, पर्यवेक्षिका सौ.वेलणकर मॅडम यांच्या हस्ते शिष्यवृत्तीस पात्र ठरलेली विद्यार्थीनी कुमारी काव्या संदीप जोशी हिचे पुष्पगुच्छ आणि पेन देऊन कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित पालक सौ.स्वाती जोशी यांचे ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती शिकविणाऱ्या शिक्षकांचेही सत्कार करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. आशालता पाटील मॅडम ,सौ.गुंड मॅडम , सौ.तेजश्री पाटील मॅडम, सौ.आबंरे मॅडम,सौ.कदम मॅडम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.