रोटरी क्लब खारघर मिड टाऊन तर्फे डॉक्टरांचा सन्मान

 रोटरी क्लब खारघर मिड टाऊन तर्फे डॉक्टरांचा सन्मान 



1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणुन साजरा केला जातो  त्या अनुषंगाने 13 जुलै रोजी रोटरी क्लब खारघर मिड टाऊन तर्फे समाजासाठी आपली मौल्यवान सेवा देणाऱ्या खारघर आणि परिसरातील विविध तज्ञ  डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.  

यावेळी डॉ राजेंद्र वाघेला यांनी आपल्या व्याख्यानात जन्मतःच बहिरेपणावर  प्रकाश टाकला.  आईच्या पोटात बाळ असताना काही कॉम्प्लीकेशन जस की रुबेला किंवा मधुमेह,  झाला तर जन्माला येणार बाळ जन्मतःच बहिरेपण घेऊन येते.  आणि हे पालकांच्या लवकर लक्षात येत नाही.  आणि जर ऐकायला येत नसेल तर मूल बोलायला शिकत नाही.  त्याची भाषा विकसित होत नाही. आणि त्यामुळे या मुलांचा विकास सर्वसाधारण मुलांसारखा होत नाही.  खूप वेळा अशी मुले शिक्षणापासून वंचित राहतात .भारतात या प्रकाराच्या आजाराचे 1000 मुलांमध्ये 8 मुलं इतके  मोठे प्रमाण आहे.  यावर cochlear implant ही शस्त्रक्रिया करून मूल ऐकू शकते आणि नंतर थेरपी दिल्या नंतर छान बोलूही शकते . जितक्या लवकर हे बहिरेपण कळले आणि उपचार झाले तितका या शास्त्रक्रियेचा फायदा अधिक होतो.  पण बाळाला ऐकु येत नाही हे कळण्यासाठी पालकांना , आशा सेविका , आरोग्य सेविका, शिक्षक यांना याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.  तसेच जर प्रसूती तज्ज्ञांनी बाळ जन्मल्या बरोबर जर तपासणी केली तर या प्रकारच्या आजाराचे निदान लवकर होऊन लवकर शस्त्रक्रिया होऊ शकते.  

आपल्या कानाच्या आतल्या भागात cochlear नावाचा शंखासारख्या आकाराचा एक भाग असतो जो बाहेरील आवाजाचे इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल मध्ये रुपांतर करतो आणि हे इलेक्ट्रॉनिक सिग्नल मेंदूकडे पाठवले जातात.  अशा प्रकारे आपल्याला ऐकू येते.  पण जर cochlear काम करत नसेल तर आपल्याला ऐकू येत नाही.  अशा वेळी या cochlear मध्ये ऑपरेशन करून एक device बसावला जातो यालाच cochlear Implant  म्हणतात.  डॉ वाघेला पुढे म्हणाले,  या शस्त्रक्रिया साठी येणारा खर्च खूप आहे आणि बर्‍याच वेळा अशा मूक बाधिर मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व सहकार्य करावे जेणेकरून मुल ऐकू व बोलू शकतील व  त्यांचे आयुष्य सुखकर होईल असे आवाहन केले आहे.