"एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"

 "एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"



 पनवेल :    21 जून रोजी वटपौर्णिमा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात.  घरामध्ये पूजन करते वेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला .     
        भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन  पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर रोपटे विविध ठिकाणी महिलांना भेट दिले.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image