नमुंमपा मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
नवी मुंबई- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.