विलास फडकेंच्या प्रयत्नातून चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा धडाका, मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते विहिघर होड रस्त्याच्या मोरीचे उद्घाटन

 विलास फडकेंच्या प्रयत्नातून चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा धडाका, मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते विहिघर होड रस्त्याच्या मोरीचे उद्घाटन




पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडले. रविवारी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील विहीघर येथे जोडरस्त्याच्या मोरीचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग करीत जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा धडाकाच सुरू ठेवला आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिपळे येथील विहीघर जोडरस्त्याच्या मोरीचे काम पूर्ण करून ग्रामस्थांना होणारी गैरसोय दूर केली. तसेच भोकरपाडा येथील रस्त्याच्या मोरीचे काम आणि डांबरीकरण देखील झपाट्याने करून घेतले. याच ग्रामपंचायत हद्दीत विहीघर गावातील अन्य विकास कामांचे उद्घाटन देखील रविवारी पार पडले.
   या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख  बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, श्री. जे एम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायणशेठ घरत, क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ फडके, तालुका चिटणीस राजेश केणी, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, शिवसेना पनवेल तालुका संघटक रामदास पाटील, चिपळे ग्रामपंचायत सरपंच सविता हिंदोळा, मा. सरपंच कांता विलास फडके, बाळकृष्ण पाटील, माजी उपसरपंच सौ. निकीता फडके, माजी उपसरपंच धनंजय पाटील, माजी उपसरपंच सौ. मिनाक्षी फडके, सौ. नर्मदा फुलोरे, मंगेश फडके, माजी सदस्य सुनिल ठाकुर, माजी सदस्य अनिल फडके, हरीश फडके, माजी उप तालुकाप्रमुख बबन फडके, कामगार नेते महेंद्र भगत, बाळकृष्ण पाटील, राज पाटील, ज्ञानेश्वर फडके, जगन फडके, विभागीय चिटणीस बाळाराम फडके, सजंय फडके आदींसह विहीघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image