पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या-प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी

पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या-प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी



     पनवेल :     गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य उग्र वास येतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. रात्री या सर्व परिसरात भरपूर प्रमाणात उग्र वास येत असतो त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेले आहे.

        या विषयात बोलताना श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की,  गेल्या तीन ते चार दिवसात अवेळी पडलेल्या पावसामुळे रात्रीच्या वेळी गैरफायदा घेऊन हवेत दूषित वायू सोडण्याचे प्रकार वाढले आहेत  सध्या आपल्या परिसरात इतर साथीचे रोगही डोके वर काढत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या केमिकल्स सदृश्य वायुप्रदूषणामुळे श्वसनाचे आजाराचे प्रमाण वाढण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

     या संदर्भात त्यांनी विभाग अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,पनवेल आणि पनवेल महानगरपालिकेला या गंभीर विषयात लक्ष देऊन ठोस पावले उचलून रात्रीच्या वेळी या येणाऱ्या वासाची चौकशी करून योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा आणि दोषींवर कार्यवाही करावी अशा प्रकारच्या मागणीचे पत्र त्यांनी दिले आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image