पनवेल वाहतूक शाखे तर्फे पनवेलमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल वाहतूक शाखे तर्फे पनवेलमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल दि.०४(संजय कदम): पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका व नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करणे कामे वाहन चालकांना थांबवून नियम पाळणे जसे हेल्मेट  वापरणे, सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. हा उपक्रम पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.

        दरवर्षी भारतात सुमारे  1.70 लाख अपघाती मृत्यू होतात. जगाच्या एकूण अपघाती मृत्यू पैकी 11% मृत्यू भारतात होतात तर जगाच्या एकूण वाहन संख्येपैकी केवळ दीड टक्के वाहने भारतात आहेत यावरून आपले असे लक्षात येते की आपल्या वाहन वापराच्या तुलनेने अपघाती मृत्यू  जास्त आहेत सदर वेळीजनतेने  पोलिसंच्या कारवाईच्या भीतीने किंवा   दंडाच्या भीतीने नियम न पाळता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नियम पालने गरजेचे आहे असे सांगितले सदर वेळी हेल्मेट वापरणे , सिट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे 0 डिंक अँड ड्राईव्ह न  करणे, वाहन चालविते वेळी मोबाईल फोन न  वापरणे इ.वाहतूक नियमांचे फ्लेक्स वापरून संदेश देण्यात आला.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image