सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

 

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल व परिचालन  प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

 


अलिबाग,दि.14(जिमाका): मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जानेवारी 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. 

      या प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205  अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाणार आहे.

       त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी दि.01 जानेवारी 2023 ते दि.30 जून 2023 (6 महिने) आवश्यक  पात्रता-उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा, (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी), उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.  प्रशिक्षण शुल्क- प्रतिमहा रुपये 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.2 हजार 700 मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमहा रुपये 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रुपये 600/- मात्र, (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा) 

      रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन मच्छिमारी नाव बांधता येते.  सरकारी किंवा खाजगी विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. 

      इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी थेट किंवा मोबाईल व व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड अलिबाग, 102/103, समृध्दी को-ऑप. हौसिंग सोसायटी, घरत आळी, एस. टी. स्टँडजवळ,रायगड अलिबाग, ता.अलिबाग या पत्त्यावर अथवा व्हॉट्सअप क्र. 9860254943 किंवा ftoalibag@rediffmail.com या ई-मेलवर सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सु.श.बाबुलगावे यांनी केले आहे.


Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image