विभागीय कुस्ती स्पर्धेचा उत्साह; रायगड, पालघर, ठाणे, मुंबईसह उपनगरातील कुस्तीपटूंचा सहभाग

विभागीय कुस्ती स्पर्धेचा उत्साह;  रायगडपालघर, ठाणे, मुंबईसह उपनगरातील कुस्तीपटूंचा सहभाग 



पनवेल(प्रतिनिधी) टाटा स्टीलच्या सावरोली येथील प्लांटच्या जवळ असलेल्या टाटा स्टील हाऊसिंग कॉलनीमध्ये मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२२ ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन टाटा स्टीलने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण संचानालयपुणेजिल्हा क्रीडा परिषद रायगडजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयअलिबाग आणि कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलखोपोली यांच्या सहयोगाने केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी कर्जत आणि खालापूर तालुक्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करवून दिला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. 

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, टाटा स्टील सीएसआर मॅनेजर भावेश रावलखोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील खालापूर तालुका कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष संतोष जंगम सुभाष घासे आदी उपस्थित होते. 

       रायगडपालघर जिल्हेठाणे महानगरपालिकाठाणे (ग्रामीण)पनवेल महानगरपालिकानवी मुंबई महानगरपालिकावसई विरार महानगरपालिकामुंबई शहरमुंबई उपनगरेमीरा भायंदर महानगरपालिकाकल्याण डोंबिवली महानगरपालिकाउल्हासनगर महानगरपालिका आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका या ठिकाणांहून स्पर्धक या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. ज्यांनी महानगरपालिकेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत अशी १४१७ आणि १९ वर्षे वयाची ३५० पेक्षा जास्त मुलेमुली या स्पर्धेत आपापली कौशल्ये आजमावत आहेत. 

 यावेळी आमदार महेंद्र थोरवे  म्हणाले कि, "टाटा स्टीलने कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या सहयोगाने कुस्ती कोचिंग सेंटरला पाठिंबा देण्यासाठी जे प्रयत्न चालवले आहेत तसेच खालापूर तालुक्यामध्ये दर्जेदार कुस्तीवीर निर्माण व्हावेत यासाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल मी कौतुक करू इच्छितो."  

         यावेळी टाटा स्टील खोपोलीचे कार्यकारी प्लांट प्रमुख कपिल मोदी यांनी सांगितले कि, "टाटा स्टीलमध्ये आम्ही मानतो की खेळ हा जीवनशैलीचा एक भाग आहे आणि म्हणूनच मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२२ सोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. युवा कुस्तीवीरांना भविष्यात अजून मोठ्या स्तरावर जाऊन खेळता यावे यासाठी आपली कौशल्ये आजमावण्यासाठी आणि त्यांमध्ये आवश्यक विकास घडवून आणण्यासाठी हा उत्कृष्ट मंच आहे, असे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image