जखमी अजगरांना जीवनदान!

 जखमी अजगरांना जीवनदान!


अलिबाग, ता. १८ : अलिबाग नजीकच्या चेहेर आणि मानी-भुते ह्या गावातून एक ८ फूट तर एक ९ फूट अश्या दोन अजगारांची सुटका करण्यात आली.

चेहेर,वाघुलवाडी येथील ग्रामस्थांकडून एक अजगर जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती मिळताच WWA(वाइल्ड लाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग) च्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजगराची सुखरूप सुटका केली.

काहीच दिवसात मानी-भुते येथून तश्याच स्थितीतून आणखी एका अजगाराची सुटका करण्यात संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आले.

दोन्ही अजगर जाळ्यात अडकल्यामुळे गंभीर जखमी झाले होते, त्यांच्या वर योग्य ते औषधोपचार करण्यात आले, ह्यासाठी RESQ, पुणे ह्या संस्थेची मोलाची मदत झाली. निरोगी व सशक्त झालेल्या अजगरांना स्थानिक वनखात्याच्या सहाय्याने नजीकच्या जंगलात सोडण्यात आले.

सदर प्रक्रियेमध्ये WWA च्या डॉ. प्रसाद दाभोळकर, साईराज झावरे, आसिफ मलिक, अविनाश थळे, संदीप घरत ह्यांनी विशेष मेहनत घेतली तसेच इतर सक्रिय  कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका निभावली.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image