ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना मातृशोक

 ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना मातृशोक 


पनवेल (प्रतिनिधी)  ज्येष्ठ पत्रकार माधव बाबू पाटील यांच्या मातोश्री तुळसाबाई बाबु पाटील यांचे रविवारी (दि. ३० ऑक्टोबर) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९३ वर्षाच्या होत्या. 

तुळसाबाई पाटील यांच्या पार्थिवावर बामणडोंगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वारकरी पत्रकारिता, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळसाबाई प्रेमळ आणि हसतमुख स्वभावाने परिचित होत्या. त्यांचा होम विधी मंगळवार दिनांक ०१ नोव्हेंबरला बामणडोंगरी येथील राहत्या घरी, दशक्रिया विधी मंगळवार दिनांक ०८ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र लांगेश्वर मोरावे येथे तर उत्तरकार्य शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबरला बामणडोंगरी निवासस्थानी होणार आहे. 
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image