दिव्यांगांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे, प्रशासनाचे कर्तव्यचं-श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे


दिव्यांगांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे, प्रशासनाचे कर्तव्यचं-श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे


*श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप संपन्न*


     *अलिबाग,दि.03 (जिमाका):-* दिव्यांग बांधव समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे, ही प्रशासनाचे कर्तव्यचं आहे, असे प्रतिपादन श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले.

     श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग अस्मिता कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले की, श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांगांची संघटना अतिशय उच्च दर्जाची कामगिरी बजावत आहे. आपल्या तालुक्यातील बांधवांना प्रमाणपत्रासाठी अलिबाग या ठिकाणी जावे लागत होते. मात्र संघटनेच्या प्रयत्नांनी व डॉक्टरांच्या सहकार्याने आपण आपल्या बांधवांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्राचे वितरण करीत आहोत. दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकारण करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग घटकासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. प्रशासन दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे.

     यावेळी तहसिलदार सचिन गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गौतम देसाई, डॉ.शुभम शेळके, डॉ.प्रतिभा फडतरे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, भरत पवार, मुईद सरखोत, संतोष पारधी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image
नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
Image