आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल(प्रतिनिधी) सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होतो, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी कानपोली येथे केले. पनवेल तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरु आहेत. त्याअंतर्गत कानपोली गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल बांधण्यात येणार आहे. या हॉलच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले.