हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही-नरेंद्र पाटील

हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही-नरेंद्र पाटील


नवी मुंबई-आज नवी मुंबई वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित हिंदुंवर होणारे अत्याचाराचा विरोधात विरोध प्रदर्शन श्री नरेंद्र पाटील यांचा उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने हिंदू जनसमुदाय उपस्थित होता. मुंबई सह उपनगरात, महाराष्ट्रात जिहादी कारवाया वाढता आहेत अत्तापर्यत या पाच सहा महिन्यातच अपहरण , खनू ,बलात्कार अशा मुंबई सह महाराष्ट्रात घटना झाल्या आहेत, याचा अतिरेक जास्त प्रमाणात  होत आहे. अशा घटनांमुळे हिंदू समाज दुखावला जातो आहे. असंतोष निर्माण होतो आहे. हिंदू समाज हे फारवेळ सहन करणार नाही. आता या नंतर जशास तसे उत्तर दिले जाईल , जशास तसे उत्तर मिळू लागलेतर पळता भईु होईल. मुस्लीम समाजातील जाणत्यांनी यात लक्ष घालनू अशा अतिरेकी समाज विघटक लोकांना वेळीच आवरावे. नाहीतर परिणाम भोगण्यास तयार राहावे असे आयोजित विरोध प्रदर्शनात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील हे बोलत होते.

"राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. हिंदुंना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे कोणाही हिंदुंनी घाबरून जाण्याचे कारण नाही. असे गुन्हे करणाऱ्यांनी जास्त मस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. लक्षात ठेवा आता राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणावर लक्ष आहे. कोणी मस्ती केली तर सर्व प्रकारचे औषध या हिंदुत्वादी सरकारकडे आहे असे यावेळी श्री पाटील बोलत होते.

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे आणि आमचे यशस्वी आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी आणि भारताचे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांचे अभिनंदन श्री.नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले.

पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रासह पुणे मुंबई महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही.पीएफआय वरील बंदीचे केंद्र सरकारचे स्वागत यावेळी त्यांनी केले.

तसेच नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चच्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकली होती. या कारवाईत तेथून तब्बल 45 मुला मुलींची सुटका केली होती. यापैकी तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता याच बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या अंगाला विक्स आणि तेल लावणे, तसेच त्यांना गुंगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात होते, असे मुलींनी सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचाही प्रकार समोर आले आहे. या बाबत अद्याप अजून पाहिजे तशी ठोस कारवाही झालेली दिसत नाहीये या बाबत प्रशासनाने ठोस असा निर्णय घेऊन अनधिकृत आश्रम तात्काळ बंद करावा नाहीतर हा समाज रस्त्यावर उतरेल असे यावेळी श्री नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

आमच्या राज्यातील  हिंदू धर्मातील अल्पवयीन मुलींना प्रेमाचा बनाव करून फुस लाऊन त्यांचे बळजबरीने धर्मांतरण करून निकाह केला जातो त्यांचा छळ केला जातो .

त्यातलेच एक मुंबईतील एक प्रकरण म्हणजे आमची हिंदू कन्या स्व.रूपाली चंदनशिवे हिने धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केलीये.. चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या या आरोपीने रुपाली चंदनशिवे हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं.. त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. यावरून तिचं आणि इक्बालची रोज भांडण व्हायचं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते विभक्त झाले होते. मात्र त्याने भेटण्यासाठी रुपालीला नागेवाडी भागात बोलावलं... आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पळ काढला. यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला.

मी कधी अशी घटना पाहिली नाही. निर्दयीरित्या मुलीला मारहाण करण्यात आले. मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही असं कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यासाठी श्री नरेंद्र पाटील हे  कुटुंबाची लवकरच भेट घेणार आहे असे ते यावेळी बोलत होते.

हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे याआधीही पोलीस तक्रार केली होती. त्यावेळी कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती.

रुपालीच्या आई-वडिलांना संरक्षण द्यावे. पोक्सो संदर्भात कारवाई अजून का झाली नाही ? ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा देखील नोंद करावा, अशी मागणी पोलिसांनाकडे आम्ही केली आहे. रुपालीच्या मुलांबद्दल सरकार नक्की दखल घेतील. हा एक दिवसाचा इव्हेंट नाही. सदर प्रकरणात मुलगी अल्पवयीन आहे. मात्र, पोक्सो अंतर्गत कलम लावण्यात आलेला नाही'.

'या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पत्र देऊन त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी श्री पाटील करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रुपालीच्या कुटुंबीयांना काही झालं तर आम्ही पोलिसांना सोडणार नाही त्यामुळे पोलिसांनी वेळीच संरक्षण द्यावे आणि या प्रकरणात जो अधिकारी दोषी आढळेल त्यांना तात्काळ निलंबित करावे ही विनंती श्री पाटील यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.

सदर सभेस यावेळी पंडित महाराज वरपे, सतिश निकम, मनीषा भोईर, प्रफुल पिसाळ,संतोष अडांगळे, नितीन मोरे,सुरेश सिंग राणा यांनी लव्ह जिहाद, अनधिकृत रित्या केले जाणारे धर्मांतरण हिंदू विरोधी कारवाया देवी देवतांची विटंबना आणि इतर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image