जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुरुमखाण आदिवासीवाडीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून तिरंग्याचे वाटप

जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुरुमखाण आदिवासीवाडीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून तिरंग्याचे वाटप


अलिबाग, दि.10 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” अभियानांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व सुशील साईकर यांच्या सहकार्याने बुरुमखाण आदिवासीवाडी येथे घरोघरी तिरंग्याचे वाटप करण्यात आले.

     दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतातल्या प्रत्येक घरावर आपला राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या धर्तीवर बुरुमखाण आदिवासीवाडी येथे जावून आदिवासी बंधू-भगिनींना जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांनी एकत्रित येवून स्पर्धा विश्व अकॅडमीच्या युवक-युवतींच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबास तिरंगा दिला. यावेळी स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी यांनी राष्ट्रध्वज कसा फडकवावा त्यासंबंधीच्या सर्व नियमांबाबत उपस्थितांना माहिती दिली.

     यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी सुरेंद्र पाटील, प्रिझम संस्थेच्या श्रेया पाटील, भाग्यश्री माळवी, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील, बुरुमखाण आदिवासीवाडीवरील सहकारी श्री.राकेश आदी उपस्थित होते.



Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image