रायगड जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलने


रायगड जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलने



अलिबाग(प्रतिनिधी) कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत तसेच रायगड जिल्हा प्रभारी सौ. चारुलता टोकस, सह्प्रभारी श्रीमती राणी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर, म्हसळा, माणगांव येथे केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध करण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतांना जीवनावश्यक वस्तूंवरील GST लावून सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहात आहे. बेरोजगारीने कहर केला असून तरुणांचे भविष्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत या सर्व गोष्टींना आमजनता त्रासली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या या निषेध आंदोलनात सामान्य जनता उस्फुर्तपणे सहभागी झालेली दिसून आली. 

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image