स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग-खालापूर-खोपोली “75 कि.मी. तिरंगा दौड” संपन्न
*अलिबाग, दि.14 (जिमाका):-* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि.14 ऑगस्ट 2022 रोजी अलिबाग-खालापूर-खोपोली “75 कि.मी. तिरंगा दौड” चे आयोजन करण्यात आले होते. या दौडच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी मशाल प्रज्वलित करून दौडमध्ये सहभागी धावपटूंच्या हाती ती मशाल सुपूर्द केली. ही मशाल घेवून हे धावपटू रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयापासून अलिबाग-खालापूर मार्गे खोपोली येथे पोहोचणार आहेत. या 75 कि.मी. तिरंगा दौडची सांगता खोपोली येथे संपन्न होईल.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, तहसिलदार (पुनर्वसन) डॉ.सतिश कदम, नायब तहसिलदार मनोज गोतारणे, अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, धनंजय गीध, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी हे उपस्थित होते.
या तिरंगा दौड कार्यक्रमाची समन्वयाची जबाबदारी तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर यांनी पार पाडली.