नगरसेविका डाॕ.सौ.सुरेखा मोहोकर यांच्या प्रयत्नाने विज वाहीनीच्या संपर्कात असलेल्या वृक्षाची छाटणी

नगरसेविका डाॕ.सौ.सुरेखा मोहोकर यांच्या प्रयत्नाने विज वाहीनीच्या संपर्कात असलेल्या वृक्षाची छाटणी

पनवेल : प्र. क्र.18मधील परदेशी आळी येथील रस्त्यालगत असलेल्या नारळाचे झाडावर महावितरणच्या अनेक केबल गेल्या असल्यामुळे पावसात वीजवाहीन्या एकमेकांच्या संपर्कात येऊन स्पार्किंग  होत व झाडाला वीजेचा शॉक लागत होता.रस्ता रहदारीचा असल्यामुळे शाळेत जाणारी अनेक विद्यार्थी,महिला , नागरिकांची सतत वर्दळ असते.समोरच राहणाऱ्या सौ.मनीषा परदेशी यांच्या निदर्शनास येताच त्या स्वतः उभे राहून नगीरकाना ,मुलांना सावधान करीत होत्या. शेकाप  कार्यतत्पर नगरसेविका डॉ सौ सुरेखा मोहोकर यांच्याकडे तक्रार येताच तातडीने पनवेल महानगर पालिका वृक्षप्राधीकरण विभाग यांच्याकडे हायड्रा शीडी उपलब्ध करून घेऊन आणि महावितरण विभागाचे श्री चौधरी साहेब यांच्या सहकार्याने तातडीने वृक्ष छाटणी करून घेतली .भविष्यात होणारा धोका टळला याविषयी सर्व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image