सभागृहनेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्या हस्ते समाजमंदिराचे लोकार्पण

सभागृहनेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्या हस्ते समाजमंदिराचे लोकार्पण 




पनवेल(प्रतिनिधी) रोहिदास वाड्यात उभारण्यात आलेले समाजमंदिर हे महापालिका क्षेत्रातील एक महत्वाचे आणि प्रतिष्ठीत अशी वास्तू येणाऱ्या काळात बनेल, असा विश्वास सभागृहनेते ठाकूर यांनी व्यक्त केला. पनवेल शहारतील रोहिदास वाड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्या हस्ते करून या समाज मंदिराचे लोकार्पण झाले.

पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, आणि नगरसेवक अनिल भगत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील रोहिदास वाड्यात समाज मंदिर उभारण्यात आले आहे. ह्या समाजमंदिर उभारणीसाठी २ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, यामध्ये वाचनालय, जीम, टेबल टेनिस, कॅरम बोर्ड तसेच सामाजिक कार्याक्रमांसाठी सभागृहा उपलब्ध आहे. या लोकार्पण सोहळ्याला पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, रोहिदास समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण कल्याणकर, शशिकांत मोहोकर, दिनकर गव्हाणकर, संजय जाधव, प्रविण मोहोकर, रजणीश जाधव, यशवंत जाधव, ताणाजी झुगे, मधुकर उरणकर, शांताराम कल्याणकर, प्रविण दुग्शीकर, राकेश जाधव, जिज्ञेश मोहोकर, सिद्धार्थ मोहिते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या मंदिरात बांधण्यात आलेल्या सभागृहाचे नगरसेविका दर्शना भोईर यांच्याहस्ते उद्घाटन झाले.