प्राचार्या इंदुमती घरत यांचे अल्पशा आजाराने निधन

 प्राचार्या इंदुमती घरत यांचे अल्पशा आजाराने निधन 


पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती बाळाराम घरत यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.


अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रासह सामाजीक क्षेत्रातही सक्रीय असलेल्या इंदुमती घरत यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्या ५७ वर्षाच्या होत्या. त्याच्या पार्थिवावर पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.