वायरमन व लाईनमनची रिक्त पदे तातडीने भरा - आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

वायरमन व लाईनमनची रिक्त पदे तातडीने भरा - आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 


पनवेल(प्रतिनिधी) विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत विभागातील वायरमन व लाईनमन यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. 

        या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायतळकर, उप कार्य अभियंता एम. बी. राख, श्री. झिल्लारे यांच्याकडे भिंगार ग्रामपंचातीचे माजी सरपंच योगेश लहाने, महेश लहाने, नरेश लहाने, सुधीर लहाने यांनी सुपूर्द केले.  
       आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत हद्दीतील भिंगारवाडी, भिंगार, शेडूंग, भेरले, बारदोली, बेलवली, ठाकूरवाडी, सांगडे, बोर्ले, अजिवली, कोन या गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गेल्या दिड ते दोन महिन्यापासून वायरमन व लाईनमन ही दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे सध्याच्या मुसळधार पडत असलेल्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांना विद्युत संदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने  विभागातील ग्रामस्थांनी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष बाब निदर्शनास आणून सुद्धा अद्यापपर्यंत ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आणि विभागात सध्या पावसाळयाची परिस्थिती पाहता तातडीने वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, असे या निवेदनात म्हंटले आहे. 
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image