पनवेल उपविभागातील पोलीस पाटील पद भरतीसाठी महिला आरक्षणाची सोडत दि.19 जुलै रोजी पनवेल येथे

पनवेल उपविभागातील पोलीस पाटील पद भरतीसाठी महिला आरक्षणाची सोडत दि.19 जुलै रोजी पनवेल येथे


     *अलिबाग, दि.11 (जिमाका):-* पनवेल उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटील ही पदे भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिलेला असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस पाटील पद भरतीसाठी दि.16 ऑक्टोबर 2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार गावनिहाय आरक्षण निश्चित केलेले आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी ठरविण्यात आलेल्या पदांमधून त्या त्या प्रवर्गातून 30 टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढणे आवश्यक आहे.

     या महिला आरक्षणाची सोडत दि.19 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता मीटिंग हॉल, तालुका क्रीडा संकुल, साईनगर, पनवेल येथे पनवेल व उरण तालुक्यांची सोडत एकत्र काढण्यात येणार आहे.

     तरी इच्छुकांनी दि.19 जुलै 2022 रोजी नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.राहुल मुंडके यांनी केले आहे.


Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image