मग मंत्री भुजबळ , वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी करतात तरी काय ? -भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सवाल

मग मंत्री भुजबळ , वडेट्टीवार  ओबीसी समाजासाठी करतात तरी काय ? -भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सवाल  


पनवेल(प्रतिनिधी) राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटा मध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत. नाहीतर तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अशा पद्धतीने डेटा सादर झाला तर सर्वोच्च न्यायालयात तो डेटा मान्य करणार नाही. तसे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची भीती  निर्माण झाली आहे. असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

       आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, ओबीसी  समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार निव्वळ टाईमपास  करीत आहे. राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ  यांनी  इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो आहे अशी कबुली नुकतीच दिली आहे.   देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे, असेही भुजबळ , वडेट्टीवार म्हणत आहेत. असे असेल तर हे मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतो.  भुजबळ , वडेट्टीवार यांच्यासारखे नेते सरकारमध्ये असूनही इम्पिरिकल डेटा मध्ये अशा चुका होत असतील तर या नेत्यांचा ओबीसी समाजाला काहीच उपयोग नाही.  
मागासवर्गीय आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे, मग एवढ्या मोठ्या चुका कशा होतात? याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते.  ते तर झालेच नाही पण आता  आडनावावरून डेटा तयार केला जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image