‘कालजयी सावरकर' लघुपटात अभिनेते मनोज जोशी 'हिंदुस्थान'च्या भूमिकेत!

कालजयी सावरकरलघुपटात अभिनेते 

मनोज जोशी 'हिंदुस्थान'च्या भूमिकेत!
अभिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पायल गोगटेअपर्णा चोथेलिना दातारऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणेशंतनू अंबाडेकरजयोस्तु मेस्त्रीदिनेश कानडेचिन्मय पाटसकरहृषीकेश भोसलेपवन वैद्य आणि प्रमोद पवार ह्यांच्या सहयोगी भूमिका आहेत.

लवकरच सदर लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला जर या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात किंवा शहरात करायचे असल्यास अमोघ पोंक्षे यांच्याशी amogh.parc@gmail.com किंवा ९४२१०१०९७१ येथे संपर्क करावा असे आवाहन निर्मात्यांतर्फे करण्यात आले आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image