खुटारी येथे हरिनाम सोहळ्याचे आयोजन

खुटारी येथे हरिनाम सोहळ्याचे आयोजन 


पनवेल(प्रतिनिधी) श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने खुटारी येथे श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने दिनांक १९ ते २१ जूनपर्यंत श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

            श्री चैतन्येश्वर महादेव मंदिर येथे होणाऱ्या या सोहळ्यात रविवार दिनांक १९ जून रोजी सकाळी अभिषेक, त्यानंतर आरती, चैतन्येश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, श्री. पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ खारघरचे भजन, ह.भ. प. संजय महाराज मढवी यांचे प्रवचन, ह.भ. प. गणेश महाराज पुलकुंठ्वार यांचे किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद, सोमवार दिनांक २० जूनला सकाळी ०७ वाजता आरती त्यानंतर ओम नर्मदेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, राधा कृष्ण प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ह.भ. प. रघुनाथ महाराज पाटील यांचे प्रवचन त्यानंतर सामुदायिक हरिपाठ, ह.भ. प. महेश महाराज साळुंखे यांचे किर्तन त्यानंतर महाप्रसाद तर मंगळवार दिनांक २१ जून रोजी सकाळी १० वाजता ह.भ. प. विक्रांत महाराज पोंडेकर (आळंदी देवाची) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक भक्त, रायगड, ठाणे परिसर, श्री सदगुरु वामनबाबा पायी दिंडी सोहळा रायगड ठाणे परिसर यांची किर्तनसाथ लाभणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक म्हणून श्री. चैतन्येश्वर ग्रामस्थ मंडळ, एकटपाडा श्री गावदेवी क्रिकेट संघ यांनी केले आहे. 
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image