मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आरोग्य शिबीर.

 मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आरोग्य शिबीर


उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा व युवा सेना, व्यापारी असोसिएशन द्रोणागिरी नोड, फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना शहर शाखा द्रोणागिरी सेक्टर 50 येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांचे ब्लड चेकअप, शुगर चेकअप, बीपी चेकअप, एस पी ओ  2, वजन तपासणी आदी तपासणी मोफत करण्यात आले. यासाठी तेजनक्ष हॉस्पिटलचे अधिकारी कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.  द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, संपर्क प्रमुख कल्पेश पाटील, शहर संघटक किसन म्हात्रे, व्यापारी असोसिएशन द्रोणागिरी नोडचे अध्यक्ष रविंद्र पाटील,उपशहर प्रमुख प्रतीक पाटील, युवा शहर प्रमुख करण पाटील, सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, द्रोणागिरी सेक्टर 50 चे शाखा प्रमुख अंकुश चव्हाण,द्रोणागिरी नोड सेक्टर 51 चे शाखा प्रमुख संजय कापसे, सेक्टर 48 चे युवा अधिकारी हितेश घरत, सागर खांडेकर, उपशाखा प्रमुख आनंद कोप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image