"कळंबोली कल्चरल सेंटर" व "देवराई" यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी वर्षा ऋतुमध्ये निसर्ग सेवा व्हावी या उद्देशाने दोन हजार रोपांची लागवड

"कळंबोली कल्चरल सेंटर" व "देवराई" यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी वर्षा ऋतुमध्ये निसर्ग सेवा व्हावी या उद्देशाने दोन हजार रोपांची लागवड



नवीन पनवेल (प्रतिनिधी)- "कळंबोली कल्चरल सेंटर" व "देवराई" यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी वर्षा ऋतुमध्ये निसर्ग सेवा व्हावी या उद्देशाने दोन हजार रोपांची लागवड तसेच वृक्ष मित्रांना रोपे वाटप व वृक्ष संवर्धन असा कार्यक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे पारंपरिक रोपांची उपलब्धता करुन देण्यासाठी देवराई फाउंडेशन कडून म्हणजेच निसर्ग मित्र आदरणीय श्री.ढोले सर यांनी पारंपरिक कडूनिंब,पिंपळ,बेहडा,तामन,पुत्रंजीवा अशी विविध प्रकारची दोन हजार रोपे उपलब्ध करुन दिली.ती रोपे आज बांठीया विद्यालय,नवीन पनवेल येथे आणून शाळेच्या प्रागंणात उतरविली आहेत. यासाठी बांठीया विद्यालयांचे  प्राचार्य श्री.माळी सर व सुधागड शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.मिलिंद जोशी सर यांचे सहकार्य लाभले.तसेच रोपे उतरविण्यासाठी व श्रमदानासाठी बांठीया विद्यालयांचे  विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वयंप्रेरणेतून सहभागी झाले.विद्यार्थी मित्रांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. या सर्व उपक्रमासाठी ग्लोबल ट्रि इनिशेएटिव्ह संस्थेच्या भारतातील समन्वयक सौ.मृणालिनी निगडे मँडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.आपण सर्व देखील या उपक्रमात  वृक्ष लागवड व संवर्धन करुन,श्रमदान देवून,वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन,वस्तूरुपात मदत देवून (जाळ्या,नेट,ट्री गार्ड),रोपे देवून वा आर्थिक रुपात मदत करून (मदतीसाठी कोणताही आग्रह नाही,मदत स्वेच्छेने असावी)सहभागी होवू शकता.

       आपल्या मधील कोणत्याही सामाजिक संस्था,पक्ष,विविध मंडळे,गृहनिर्माण संस्था यांना मोफत रोपे भेटू शकतील.(फक्त रोप लावण्यासाठी काढलेल्या खड्ड्याचा फोटो व रोप लावल्यानंतर चा फोटो आम्हाला पाठवावा)ही माफक अट आहे.आपल्याला या निमित्ताने निसर्गाची सेवा करण्याची,मिळालेल्या संधीचा लाभ घेवूया, चला झाडे लावूया.                                             

       या कामी समाजसेवक श्री . सतीशभाऊ महाजन,उपप्राचार्य श्री.तिरमले सर,पर्यवेक्षक श्री . महाजन सर,पर्यवेक्षक श्री कुंभार सर, पर्यवेक्षक श्री गोखले सर व सर्व सहकारी शिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.




Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image