एमपीसीबीच्या कामोठे येथील धडक कारवाईत प्लास्टिकचा साठा हस्तगत

एमपीसीबीच्या कामोठे येथील  धडक कारवाईत  प्लास्टिकचा साठा हस्तगत 

पनवेल दि. १० ( वार्ताहर ) :   एमपीसीबीच्या पथकाने कामोठे वसाहती मध्ये केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा हस्तगत केला आहे . 

      राज्य सरकारने बंदी घातलेल्या आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागातर्फे करवाईचे सत्र सुरू आहे. रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामोठे येथे टाकलेल्या धाडीत तब्बल एक टन प्लास्टिकचे साहित्य व पिशव्या जप्त केल्या. एमपीसीबीच्या कारवाईमुळे बेकायदा प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर सरकारने बंदी घातली आहे; तरीसुद्धा बाजारपेठांमध्ये सर्रासपणे या पिशव्यांचा वापर केला जातो. रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून क्षेत्र अधिकारी अभिजित लोहिया व रूपाली सोनकांबळे यांनी कामोठ्यातील होलसेल प्लास्टिक विक्री दुकानावर धाड टाकली. कारवाईत कामोठे, सेक्टर १० येथील राजेश्वर ट्रेडर्स दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या, किराणा बॅग, दूध बॅग, चमचे, ग्लास, जेवणाच्या पत्रावळ्या आदी २०० किलो आणि दुकानाच्या गोदामातून ८०० किलो असा एकूण एक टन प्लास्टिकचा माल हस्तगत केला.प्लास्टिकचा माल घेऊन आलेल्या टेम्पोचालकावरही या वेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. चालकाकडून पाच हजार तर प्लास्टिक विक्रेत्याला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. एमपीसीबीच्या कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. धाड टाकून हस्तगत केलेला माल विल्हेवाट लावण्यासाठी पनवेल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image